गाडी निघाली कोकणाला – Gadi Nighali Koknala | गणपती सणाला Ganpati Sanala | Ganpati Bappa New Song
अभंग लिरिक्स
आनंद झालाय गं माझ्या मनाला,
आनंद झालाय गं माझ्या मनाला।
गौरी गणपतीच्या ग सणाला,
गाडी निघाली कोकणाला॥
गौरी गणपतीच्या सणाला,
गडी निघाली कोकणाला॥
—
अंतरा १
अरे लवकर लवकर तयारी करा,
मोदक-लाडू पिशवीत भरा।
अ लवकर लवकर तयारी करा,
मोदक-लाडू पिशवीत भरा॥
मानपान द्यायचं हाय गणाला,
मानपान द्यायचं हाय गणाला॥
गौरी गणपतीच्या सणाला,
गडी निघाली कोकणाला॥
—
अंतरा २
आताशी पनवेलला थांबली गाडी,
लांबच आहे सावंतवाडी।
आताशी पनवेलला थांबली गाडी,
लांबच आहे सावंतवाडी॥
आस भेटीची लागली ओढ मनाला,
आस भेटीची लागली ओढ मनाला॥
गौरी गणपतीच्या ग सणाला,
गडी निघाली कोकणाला॥
—
अंतरा ३
पाहताच भक्तीत गेलो या वाहून,
गणरायाचं दर्शन घेऊन।
पाहताच भक्तीत गेलो या वाहून,
गणरायाचं दर्शन घेऊन॥
कमलेश येतोय गाण गावाला,
कमलेश येतोय गाण गावाला॥
गौरी गणपतीच्या ग सणाला,
ग गाडी निघाली कोकणाला॥
—
समाप्ती
आनंद झालाय गं माझ्या मनाला,
आनंद झालाय गं माझ्या मनाला।
गौरी गणपतीच्या ग सणाला,
ग गाडी निघाली कोकणाला॥
गौरी गणपतीच्या ग सणाला,
ग गाडी निघाली कोकणाला॥
अर्थ
या गीतात गौरी-गणपती उत्सवाची आनंदमय आणि भावपूर्ण अनुभूती व्यक्त केली आहे. गणरायाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांचा उत्साह, तयारी आणि आपल्या गावाकडे परतण्याची ओढ या गीतातून सुंदरपणे मांडली आहे. प्रवासातील आनंद, गणपती बाप्पाच्या दर्शनाची आस आणि कुटुंबासोबत सण साजरा करण्याचा आनंद यातून प्रकट होतो. गणरायाच्या दर्शनाने मन भक्तिभावाने भरून जाते आणि संपूर्ण वातावरण मंगलमय होते. एकूणच, हे गीत गौरी-गणपती उत्सव, कौटुंबिक एकोप्याचा आनंद आणि श्रीगणेशावरील भक्ती यांचे सुंदर चित्रण करणारे आहे.
Song Credit
| Singer | Navin Jadhav |
| Music | Kamlesh Gaikwad |
| Lyricist | Kamlesh Gaikwad |
| Label | Mohan Media Bhakti |

