शंकर हे नाम सुखाचे सदन – Shankar He Nam Sukhache Sadan | Shravan Somvar Bhajan Marathi | Shiv Shankar Bhajan | Bholenath Bhajan | Har Har Mahadev Bhajan
अभंग लिरिक्स
मुखडा……….
शंकर हे नाम सुखाचे सदन,
शंकर हे नाम सुखाचे सदन।
भवबाधा जाण,
भवबाधा जाण सुखे येणे।
शंकर हे नाम सुखाचे सदन,
शंकर हे नाम सुखाचे सदन॥
—
अंतरा १
भ्रांतीचा पडदा शिवकृपेने गे,
भ्रांतीचा पडदा शिवकृपेने गे।
मग ते अवघे,
मग ते अवघे समाधान॥
शंकर हे नाम सुखाचे सदन,
शंकर हे नाम सुखाचे सदन॥
—
अंतरा २
प्राज्ञेचे पुरुष अहोरात्र दिन,
प्राज्ञेचे पुरुष अहोरात्र दिन।
करीती भजन,
करीती भजन सदोदित ॥
शंकर हे नाम सुखाचे सदन,
शंकर हे नाम सुखाचे सदन॥
—
अंतरा ३
लक्ष्मण म्हणे.. शिवनाम हे सार,
लक्ष्मण म्हणे शिवनाम हे सार।
घ्या सुखापार..
घ्यात्या सुखापार नाही जाण॥
शंकर हे नाम सुखाचे सदन,
शंकर हे नाम सुखाचे सदन।
भवबाधा जाण,
भवबाधा जाण सुखे येणे॥
अर्थ
या भक्तिगीतात भगवान शंकराच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. शंकराचे नाव हेच खरे सुख, शांती आणि समाधानाचे स्थान असून त्याच्या कृपेने मनातील अज्ञान, भ्रम आणि दुःख दूर होतात. ज्ञानी भक्त अहोरात्र शिवाचे भजन करून त्याच्या चरणी अखंड भक्तिभाव ठेवतात. शेवटी कवी सांगतात की, शिवनाम हेच जीवनाचे खरे सार असून त्याच्या स्मरणाने भवसागरातून मुक्ती आणि चिरंतन आनंद प्राप्त होतो.
Song Credit
| Singer | Balaji Bhete |
| Music | SB Music Studio |
| Lyricist | Traditional |
| Label | Mohan Media Bhakti |

